जतेत तीन दिवसात तेरा कोरोना पॉझिटिव्ह


जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील दिवाळीच्या अखरेच्या तीन दिवसात तेरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.देशात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढत आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे. मात्र दिवाळीतील तुफान गर्दी,नागरिकांनी केलेले प्रशासनाच्या नियमाचे उल्लंघन यामुळे पुढील काही दिवसात कोरोना बाधित आकडा वाढण़्याची शक्यता व्यक्त होत आहे.


 तालुक्यात रविवार ता.15 ला 8, सोमवार ता.16 ला 4,तर मंगळवार ता.17 ला 1 कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे.गेल्या आठ दिवसात तालुक्यात 62 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.