अंकलेत आज जम्बो विकासकामांचे भूमीपुजन | आमदार विक्रमसिंह सांवत यांची उपस्थिती
जत,प्रतिनिधी : अंकले जा.जत येथे मंगळवार ता.3 रोजी आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते विविध विकास कामांचा भूमीपुजन सोहळा संपन्न होणार आहे.
जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील यांच्या‌ मार्गदर्शनाखाली अंकले ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात आली आहेत.मंगळवारीही असाच सुमारे 60 लाख निधीच्या विकास कामांच्या शुभारंभाचा जम्बो कार्यक्रम आयोजित केला आहे.यावेळी अंकले गावाअतर्गंत सुतार गल्ली ते हायस्कूल जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण(25 लाख),जानकर वस्तीवरील सभागृह(10 लाख),सरगर वस्ती जि.प.शाळा 3 खोल्या दुरूस्ती,सरगर वस्ती अंगणवाडी वॉल कंपाउड (1.65 लाख),शाळा किचन शेड दुरूस्ती(99 हजार),दलित वस्ती बधिंस्त गटार( 7.50 लाख),दलित वस्ती रस्ता कॉक्रीटीकरण (7.50लाख) या विकास कामांचा शुभारंभ ‌आ.सांवत यांच्यहस्ते संपन्न होणार आहे.

यावेळी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार,माजी सभापती बाबासाहेब कोडग,कॉग्रेसचे कार्याध्यक्ष नाना शिंदे,बाजार समिती संचालक अभिजीत चव्हाण, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, आप्पा मासाळ,रामचंद्र पाटील व स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.