फिंगर मशीनची प्रिंट बंद पाडून रेशनकार्ड धारकांची लुट

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात स्वस्तधान्य दुकानातून गरिबांच्या धान्यावर डल्ला मारून ते धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी नेहण्याचा प्रकार पुन्हा समोर आल्याने,पुरवठा विभागाच्या अर्थपुर्ण सहयोगाने रेशनकार्ड धारकांना लुटणारे लुटेरे तालुक्यात सक्रीय झाले आहे.मशिनची प्रिंट बंद पाडून कार्डधारकांना लुटण्याचे प्रकार अनेक गावात राजरोसपणे सुरू आहेत.
शनिवारी दोन घटनेत जवळपास आंशी पोती काळ्या बाजारात जाणारे धान्य जप्त करण्यात आले आहे.

गावागावतील स्वस्तधान्य दुकानदाराकडून कार्डधारकांची दिवसाढवळ्या लुट केली जात आहे.फिंगर मशिनमधील न देताच मनमानी पणे धान्याचे वाटप केले जात आहे.
यावर नियत्रंण असणारे पुरवठा विभाग लाचार झाला असून, अशा भ्रष्ट दुकानदारांना पाठीशी घालण्याचा प्रकार होत आहे.अधिकारी धान्य दुकानदारांवर कारवाई करण्यापेक्षा त्याला पाठीशी घालण्याचा प्रकार करत आहेत.त्यामुळे धान्य तस्करांच्या टोळ्या कार्यरत आहेत.