केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कठोर परिश्रमाची गरज


जत,वार्ताहर : विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण गाठण्यासाठी गावची माया व्हाट्सअप ग्रुपने मदतीचा उपकम राबविला आहे.मुलांनी पुढचे ध्येय गाठण्यासाठी आत्तापासूनच तयारी करावी.तरच जीवनामध्ये यशस्वी होतो.केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कठोर परिश्रमाची गरज आहे.आत्तापासूनच ग्रंथालयात जाऊन पुस्तके  वाचणे आवश्यक आहे.त्यातून निश्चित मार्ग मिळेल असे मत सोलापूर येथील संगमेश्वर कॉलेजचे उपप्राचार्य डी.के.मेत्री यांनी व्यक्त केले.अंकलगी ता.जत येथील जय हनुमान विद्यामंदिर हायस्कूल मध्ये गावच्या माया व्हाट्सअप ग्रुपच्या वतीने एनआयटी परीक्षेतून मंगलोर अभियांत्रिकी पदवी शिक्षणासाठी प्रवेश मिळाल्याबद्दल दिपाली तेळगीनतोट हिचा सत्कार करण्यात आला.सत्कार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी चेअरमन विजयकुमार चिपलकट्टी होते.स्वागत व प्रास्ताविक रवि डोळळी यांनी केले.उपप्राचार्य मेत्री म्हणाले, दिपाली यांनी गावचे नाव एकदम उंच शिखरावर नेले आहे.यावेळी विजयकुमार चिपलकट्टी,महादेव केदार,पोलीस पाटील आप्पासाहेब बिरादार यांंचे भाषण झाले.यावेळी कोविंड अंतर्गत गावामध्ये चांगल्या रीतीने मध्ये काम केल्याबद्दल पोलीस पाटील आप्पासाहेब बिरादार,आशा वर्कर सरोजनी धाबेकर,तिप्पवा माळी,शिल्पा राठोड, कल्पना पुजारी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमास मुख्याध्यापक एस.आर.उमराणी,उपसरपंच काशीराया रेबगोंड,माजी उपसरपंच बिराण्णा कोहळी,गावची माया ग्रुपचे सदस्य,जि.प.कन्नड शाळेचे मुलांचे व मुलींचे मुख्याध्यापक मांतेश माजी,महादेव चनगोंड व ग्रामस्थ उपस्थित होते.


अंकलगी ता.जत येथील दिपाली तेळगीनतोट व कोविंडीचे काम केल्याबद्दल पोलीस पाटील आप्पासाहेब बिरादार व आशा वर्कर यांचा सत्कार करण्यात आला.