हवामानाचा फटका तूर उत्पादनात घट तूर पिकाची फुलगळ व अळीचा प्रादुर्भाव | औषध फवारणीची वेळ

सोन्याळ,वार्ताहर : जत तालुक्यात पडलेल्या परतीच्या पावसामुळे अतिवृष्टी होऊन शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते; परंतु या परतीच्या पावसाचा फायदा जत तालुक्यातील तूर पिकाला मोठ्या प्रमाणावर झाला होता. मात्र,पावसाने उघडीप दिल्यानंतर गेल्या काही दिवसातील धुक्यामुळे तुर पिकावर फूलगळ व पान कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. प्रादुर्भाव  मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्याने तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील तूर पीक धोक्यात आले असून उत्पादनात कमालीची घट होणार आहे.


रोगाला अटकाव करण्यासाठी औषध फवारणी करून तूर उत्पादक शेतकरी  प्रयत्न करीत आहे.जत, आटपाडी, कवठेमहांकाळ,
खानापूर, तासगाव तालुक्यात तुरीचे उत्पादन घेतले जाते. जत तालुक्यात 7 हजार 751 हेक्टरवर तुरीची पेरणी झाली आहे. मात्र परतीच्या पावसाने तुरीचे मोठे नुकसान झाले आहे.

उत्पादनात सुमारे 40 ते 50 टक्के घटहोण्याची भीती तूर भीती तूर उत्पादक
शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
शेतात पाणी साचलं. मुळं कुजली.येणारा पैसा थांबला. त्यामुळे येणाऱ्या रब्बी हंगामासाठी पैसा कसा उभा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.