जत तालुक्यात बंदी असतानाही गुटख्याची खुलेआम विक्री

0




उमदी,वार्ताहर : राज्यात गुटखा बंदी झाली असली, तरी गेल्या कित्येक वर्षांपासून छुप्या पद्धतीने गुटख्याची विक्री सर्रास सुरू आहे. जत तालुक्यातही गुटख्याची अशा पद्धतीने सर्रास विक्री होत आहे.अन्न सुरक्षा मानके कायदा पायदळी तुडवीत जत‌ शहरासह तालुक्यातील गावागावातील प्रत्येक पानटपरींवर अवैधरीत्या गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखूची राजरोसपणे सर्रास विकली जातेय.



टपऱ्यांपैकी 90 टक्क्यांपेक्षा जास्त टपऱ्यांमध्ये गुटाख्याची सर्रास विक्री होत आहे. अनेक पानटपरीचालक गुटख्याची पाकिटे लपवून ठेवून विक्री करतात, तर काही पानटपरी चालक उघडपणे गुटख्याची विक्री करताना दिसतात. अनेक टपरीचालकांचे चौकांतील पोलिस तसेच गस्तीवरील पोलिसांशी साटेलोटे असल्याने बिनदिक्कतपणे गुटखा विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे बोलले जात आहे.

Rate Card



धक्कादायक म्हणजे यातील काही पान टपऱ्यांवर गुटख्यासोबत देशी दारूदेखील विकली जाते. काही ठिकाणी तर गांजादेखील विकला जातो. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जत शहरात विक्रीसाठी गुटखा सहज उपलब्ध होत आहे.कर्नाटकातून शहरात गुटखा दाखल होतो. गुटखा तस्करांकडून पानटपरींवर तो पोहचतो व शहरात प्रत्येक पानटपरींवर मागेल त्यांना गुटखा मिळत असतो.



शाळेच्या परिसरात गुटखा विक्रीस बंदी असूनही अनेक टपऱ्या, दुकानांत गुटख्याची पाकिटे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये गुटख्याचे व्यसन वाढल्याचे मत सुज्ञ नागरिकांनी नोंदविले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या प्रमाणात गुटखा पकडला होता. पण तरीदेखील गुटखा मोठ्या प्रमाणात विकला जात असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होतेय.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.