शहरात प्रदूषण,अपुऱ्या पाणीपुरवठ्याची चिंता, जत‌ नगरपरिषद क्षेत्रातील स्थिती

जत,प्रतिनिधी : लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या जत‌ नगर परिषदेला आठ वर्षांचा कालावधी लोटला आहे. पूर्वाश्रमीची 
ग्रामपंचायत बरखास्त करून पालिका स्थापन कारण्यात आली आहे.या पालिकेत सध्याच्या घडीला वाढते प्रदूषण, वाहतूककोंडी, पाणीपुरवठा आदी महत्त्वाच्या समस्या बनल्या आहेत. या व्यतिरिक्त इतरही समस्या आहेत.जत शहराची व्याप्ती वाढत चालली आहे. झपाट्याने येथील लोकसंख्या वाढत चालली आहे.त्या दृष्टीने वाहनांची संख्या वाढणार आहे.याबाबत पालिकेने आत्ताच नियोजन करण्याची गरज आहे. पालिकेला पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने स्वतःच्या नव्या
योजना व शहरातील नव्या पाईपलाईनची नितांत आवश्यकता आहे. सध्याच्या घडीला पालिका बिरनाळ तलावातून पाणी घेत आहे. अपुरा पाणीपुरवठा ; पालिका क्षेत्रात मुबलक पाणीपुरवठा करील, अशी यंत्रणा नाही.पालिकेचे अधिकारी जबाबदारी झटकण्याचे काम करतात.त्याचा त्रास नागरिकांना होतो.