रिपाइंला डावलल्यास भाजपा उमेदवारांना किंमत मोजावी लागेल ; विकास साबळे

जत,प्रतिनिधी : पुणे पदवीधर मतदारसंघात रिपाइंला विचारात न घेतल्यास भाजपाला त्याची किंमत मोजावी लागेल,असा 
इशारा रिपाइंचे‌ जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे यांनी दिला आहे.

साबळे पुढे म्हणाले,भाजप रिपाइं राष्ट्रीय पातळीवर महायुती आहे त्यामुळे लोकसभा विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक केंद्रीय मंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशाने सर्व रिपाइं कार्यकर्ते मनापासून भाजपसोबत असतात.परंतु निवडून आल्यानंतर विविध कार्यक्रम किंवा खासदार,आमदार फंड वाटपात रिपाइं कार्यकर्त्यांना डावलले जाते आहे.

विविध शासकीय समितीवर निवडीच्या वेळी कुठेही रिपाइंचा विचार केला जात नाही.पदवीधर मतदार संघात सांगली जिल्ह्यात 86 हजार 700 व शिक्षक मतदारसंघात 6,800 च्या आसपास मतदार आहेत.यापैकी बहुतांशी मतदार हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारे आहेत.तसेच रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा सांगली हा जन्म जिल्हा असल्याने या जिल्ह्यात ना. आठवले यांना माननारा फार मोठा मतदार वर्ग आहे.तरीही भाजपचे उमेदवार व सर्व भाजपा प्रचारक अद्याप रिपाइंच्या कोणत्याही नेत्यास कार्यकर्त्यास सोबत न घेता फक्त निळ्या झेंड्याचा वापर करताना दिसत आहेत. 


मतदानाचा दिवस जवळ आलेला आहे,अशी परिस्थिती असताना सुद्धा आम्हाला डावलले जात आहे.यापुढे आमच्या नेत्यांचा सन्मान व्हावा अन्यथा आम्हची ताकद दाखवावी लागेल व त्याची किंमत भाजपा उमेदवाराला जरूर मोजावी लागेल,असा इशाराही सांबळे यांनी दिला आहे.