सात वर्षाच्या मुलीची हत्या करुन यकृत बाहेर काढलं,

उत्तर प्रदेशात सात वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडला असून यकृत बाहेर काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीवर बलात्कार झाल्याचाही संशय असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 
मुलाच्या हव्यासापोटी गावातील एका दांपत्याने मुलीच्या हत्येचा कट रचला होता.
 यासाठी त्यांनी मुलीच्या शेजारी राहणाऱ्या दोघांना एक हजार रुपये दिले होते. 
 रात्री दोघांनी मुलीचं अपहरण केलं.
 दारुच्या नशेत असणाऱ्या दोघांनीही मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर तिची हत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

 मुलीची हत्या केल्यानंतर त्यांनी यकृत बाहेर काढलं आणि विधी करण्यासाठी दांपत्याकडे सोपवलं असंही पोलिसांनी सांगितलं आहे. 
 सकाळी मुलीचा मृतदेह गावात सापडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 
शरिरातील इतर अवयवही बाहेर काढण्यात आले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.सर्व चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.“प्रकरणाचा छडा लावण्यासाठी अनेक टीम तयार करण्यात आल्या होत्या. 


संशयाच्या आधारे मुलीचे शेजारी अंकुल आणि बीरन यांना ताब्यात घेतलं. 
चौकशीदरम्यान त्यांनी कबुली दिली. 
अंकुरचे काका परशुराम यांनी आम्हाला पैसे दिले होते अशी माहिती त्यांनी दिली,” असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
 पोलिसांनी पुढे दिलेल्या माहितीनुसार, “दोन्ही आरोपींनी मुलीसोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला.


 यानंतर तिचं यकृत बाहेर काढलं आणि परशुराम यांच्याकडे नेऊन सोपवलं”. परशुरामचं १९९९ मध्ये लग्न झालं असून मूल नसल्याने त्याला नैराश्य आलं होतं असं पोलिसांनी सांगितलं आहे.