दरिबडचीत काळ्या बाजारात जाणारे रेशनचे धान्य जप्त

संख,वार्ताहर : दरिबडची ता.जत 
येथे रेशनची धान्ये टाटा सफारी गाडीतून नेहत असल्याच्या संशयावरून नागरिकांनी गाडी पकडत संख अप्पर तहसीलदार यांच्या ताब्यात दिली.
दरिबडची येथील आनंदराव आप्पासो पाटील यांच्या रेशनचा गहू,तांदूळ काळ्या बाजारात टाटा सफारी गाडीतून नेहण्यात येत असताना नागरिकांनी गाडी पकडली.






उपस्थित नागरिकांनी संख अप्पर तहसीलदार यांना कळविण्यात आले.त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचत वाहन ताब्यात घेत कार्यालयाकडे आणण्यात आले आहे. तेथे वाहनातील चालकांने गाडी लॉक करत पळ काढल्याने रात्री उशिरापर्यत धान्याचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते.






दरिबडची येथे मोठ्या प्रमाणात जमाव जमत हे धान्य थेट काळ्या बाजारात जात असताना नागरिकांनी ताब्यात घेत,संख अप्पर तहसीलदार यांना कळविल्याने रेशनच्या धान्याचा काळाबाजार समोर आला असल्याचे ग्रा.प.सदस्य अमसिंध्द शेंडगे यांनी सांगितले.