उमराणी मग्रारोहयोतील अनियमितता वसूली | चंद्रकांत गुड्डेवार यांचा दणका ; गटविकास अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूलीचा इशारा

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील उमराणी येथील मग्रा.रोजगार हमी योजनेत झालेल्या आर्थिक अनियमिततेतील दोषीकडून वसूली रक्कम करण्यास विलंब केल्याबद्दल थेट 1 डिसेंबरपर्यत ही रक्कम वसूल न झाल्यास गटविकास अधिकारी यांच्या वेतनातून ती वसूली केली जाईल,असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुड्डेवार यांनी जतचे गटविकास अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे दिला आहे.


उमराणी येथे करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेतून केलेल्या कामात अनियमित पणा झाला होता.शासनाचा निधी व्यर्थ गेला होता.उमराणीतील एका तक्रारीवरून केलेल्या तपासणीत भष्ट्राचार झाल्याचे आढळून आले होते.त्यानुसार 26/6/2019 रोजी जतचे गटविकास अधिकारी यांना संबधित दोषी व्यक्तीकडून सदरची रक्कम वसूली करण्याचे कळविले होते.मात्र अद्याप पर्यत वसूली न केल्याने अखेर गुड्डेवार यांनी गटविकास अधिकारी यांना दणका देत आपल्याकडून कर्तव्यात दिरंगाई झाल्याचे स्पष्ट करत ही रक्कम ता.1 डिसेंबर 2020 पर्यत वसूल न केल्यास माहे डिसेंबर 2020 चे वेतनातून ही रक्कम वसूल करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता ही रक्कम संबधिताकडून वसूल होणार का गटविकास अधिकारी यांना भरावे लागणार याबाबत उत्सुकता लागली आहे.या कारवाईमुळे वरिष्ठ कार्यालयाचे आदेश बेदखल करणाऱ्या अधिकाऱ्यांना या कारवाईमुळे चाफ बसणार आहे.