प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी करा

0



सोन्याळ,वार्ताहर : प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (प्रति थेंब अधिक पीक) केंद्र पुरस्‍कृत सूक्ष्‍म सिंचन योजना 2020-21मध्‍ये राबविण्‍यासाठी केंद्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास संमती दर्शवली असून अर्ज करण्याची प्रक्रिया शेतकऱ्यांच्या दृष्टीने गैरसोयीचे आणि किचकट आहे.त्यामुळे ठिबक सिंचन योजनेपासून लाभार्थी शेतकरी वंचित राहणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत करण्याची मागणी केली जात आहे.






प्रत्‍येक शेतकऱ्यांच्‍या शेतास पाण्‍याची उपलब्‍धता करणे आणि पाण्‍याची कार्यक्षमता वाढवून पाण्‍याच्‍या प्रत्‍येक थेंबातून जास्‍तीत जास्‍त पीक उत्‍पादन मिळविणे या उद्देशाने सन 2015-16 पासून सूक्ष्‍म सिंचन योजना प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना या केंद्र शासनाच्‍या महत्‍वाकांक्षी योजनेमध्‍ये समाविष्‍ट केली आहे.लाभार्थींना नोंदणीसाठी युजर आयडी व पासवर्ड देण्‍यात येणार आहेत. यासाठी लाभार्थींचा आधार क्रमांक हाच युजर आयडी असेल. शेतकऱ्यांकडून अर्ज फक्‍त ई-ठिबक आज्ञावलीमध्‍ये ऑनलाईन प्रणालीद्वारेच स्‍वीकारण्‍यात येणार आहेत. लाभार्थीनी ऑनलाईन अर्ज सादर केल्‍यानंतर स्‍वयंचलित संगणकीय प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना उपलब्‍ध अनुदानाच्‍या मर्यादेत ऑनलाईन पूर्वसंमती प्रदान करण्‍यात येणार आहे.





Rate Card



त्यासाठी शेतकऱ्यांना स्वतः आपले सरकार शासकीय सेतू केंद्रावर किंवा संबधीत ठिबक विक्रेत्याकडे जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावे लागणार आहे.ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी लाभार्त्याच्या आधार क्रमांकाशी मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.मोबाइलवर ओटीपी मिळवून अर्ज करावे लागते किंवा आधारला मोबाईलला नंबर लिंक नसल्यास  बायोमेट्रिक मशीनवर थम्ब (अंगठा) उठवणे गरजेचे आहे. काही शेतकऱ्यांचे त्यांच्या वयोमानाने अंगठा घासून नाजूक झाल्याने  बायोमेट्रिकवर अंगठा उठत नाही.







शिवाय प्रत्येक शेतकऱ्यांचे आधारला मोबाईल नंबर लिंक नसते.त्यामुळे महाडीबीटी पोर्टलवर  ऑनलाईन अर्ज करणे अडचणीचे ठरत आहे.ही प्रक्रिया ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने गैरसोयीचे ठरत असल्याने या योजनेपासून अनेक शेतकरी वंचित राहत आहेत.ही ऑनलाईन प्रक्रियातील ऑनलाइन अर्जासाठी आवश्यक प्रक्रिया सोपी होण्यासाठी बायोमेट्रिकवर थम्ब घेणे व ओटीपी मिळवून अर्ज करणे ह्या दोन्ही गोष्टी काढून पूर्वीप्रमाणेच अर्जाची प्रक्रिया राबवण्यात यावे आणि इतर किचकट बाबी कमी करून प्रत्येक शेतकऱ्यांना सोयीचे व्हावे यासाठी जत तालुका ठिबक सिंचनाच्या वितरकानी जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांना भेटून निवेदन दिले आहे. यावेळी प्रभाकर कमतगी,बसवराज कुंभार, बाळासाहेब माने,महादेव तावशी,रियाज मणेर, विठ्ठल पुजारी, रेवणसिध्द कुंभार, इरप्पा कन्नूरे आदी उपस्थित होते.




Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.