जाळीहाळ बु | मध्ये 70 हजाराचा गांज्या जप्त

जत,वार्ताहर : जाळिहाळ बुद्रुक ता.जत येथे बेकायदा गांज्याची लागवड केल्याप्रकरणी उमदी पोलीसांनी एकास अटक करत 70 हजार रूपये रक्कमेचा 7 किलो 200 रुपयाचा ओला गांज्या जप्त केला.प्रकाश भगवंत बिराजदार,(रा.जाळीहाळ)यांना याप्रकरणी अटक केले आहे.
अधिक माहिती अशी,नुतन डिवायएसपी रत्नाकर नवले यांनी जत तालुक्यातील बेकायदा धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.त्या पार्श्वभूमीवर उमदी पोलीसाकडून अवैध धंद्यावर कारवाई करण्यात येत आहे.जाळीहाळ बु.येथे प्रकाश बिराजदार यांनी राहत्या घराच्या पाठीमागे गांज्याची झाडे लावल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.
त्याआधारे छापा टाकला असता 70 हजार‌ रूपये किंमतीचे 7 किलो 200 ग्रँम गांज्याची ओली झाडे जप्त करण्यात आली आहेत.पंचनामा करून मुद्देमालासह संशयिताला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.सा.पो.नि.दत्तात्रय कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक नामदेव दांडगे,हवलदार कोळी,गडदे,नितीन पलूसकर,श्रीशैल वळसंग,आप्पा कुंभारे,शिवाजी हाक्के, नागेश खरात यांनी कारवाई केली.


जाळीहाळ खुर्द ता.जत येथे पकडलेल्या गांज्यासह संशयित आरोपी व पोलीस पथक