जतेत दोन दिवसात एकही कोरोना बाधित नाही | कोरोनामुक्तीकडे वाटचाल | फक्त 38 जण उपचाराखाली

जत,प्रतिनिधी : जिल्ह्यातील बाधित रुग्णसंख्येच्या प्रमाणात अल्पशी वाढ दिसून येत असताना जत गत महिन्याप्रमाणेच पुन्हा एकदा कोरोनामुक्त झाला आहे, तर गेल्या दोन दिवसात जत तालुक्यात एकही रुग्ण आढळून आलेला नारी.ही जिल्ह्याच्या दृष्टीने ही मोठी दिलासादायक बाब आहे.


जत तालुक्यात कोरोनाने घातलेला विळखा कमी करण्यात प्रशासनाचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत.देशभर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भिती व्यक्त होत असताना जत तालुक्यातील कोरोना मुक्तीकडे वाटचाल दिलासादायक आहे.गेल्या आठवड्यापासून कमी झालेली नवे रुग्ण गेल्या दोन दिवसात एकही आढळून आलेला नाही.


तालुक्यात सध्या फक्त 38 जणावर उपचार सुरू आहेत.रवीवार सोमवार दोन दिवसात तब्बल 19 जण कोरोनामुक्त झाले आहेत.कोरोना मुक्त होणारी संख्या मोठी असून गेल्या पंधरा दिवसात एकाही कोरोना बाधिताचा मुत्यू झालेला नाही.एकीकडे नागरिकांची दक्षता प्रशासनाची सतर्कताचा फायदा कोरोना रोकण्यात झाला आहे. तालुक्यात आतापर्यत 1985 जण कोरोना बाधित झाल्याचे तालुका प्रशासनाकडे नोंद आहे. तर त्यापैंकी 1785 जण कोरोना मुक्त झाले आहेत.तर 62 जणांचा कोरोनामुळे दुदैवी मुत्यू झाला आहे.