आंवढी,माडग्याळमध्ये प्रत्येकी 2 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण


जत,प्रतिनिधी : देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याची भिती एकीकडे व्यक्त होत असताना जत तालुक्यात कोरोनाचा प्रभाव आजही आवाक्यात असल्याचे चित्र आहे.गेल्या आठवड्यात तालुक्यात कोरोना बाधित आकडा एक आकडीवर आहे. शुक्रवारी फक्त पाच नवे रुग्ण आढळून आले आहेत.
तालुक्यातील आंवढी 2,वाळेखिंडी 1,माडग्याळ 2 येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत.

तालुक्यातील संख्या 1846 झाली आहे.तर कोरोना मुक्त संख्या 1715 झाली आहे.