जतेत पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढले | शनिवारी 17 नवे रुग्ण ; दिवाळीतील हलगर्जी पणाचा फटका | जत 7,डफळापूर 3,उमराणी 2

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात दिवाळीनंतर कोरोनाची संख्या वाढू लागली आहे.तालुक्यात रुग्ण संख्येचा आकडा एक अंकी वरून दोन अंकीवर पोहचला आहे.
तालुक्यात शनिवारी एकदम नवे 16 रुग्ण समोर आले आहेत.
शनिवारी करण्यात आलेल्या तपासणीत जत 7,डफळापूर 3,कोळेगीरी 2,उमराणी 1,उमदी 1,येळवी 1,वाळेखिंडी 1 येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत.

यामुळे तालुक्यातील बाधित 1832 झाली असून आतापर्यत 1725 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे.61 जणाचा कोरोनामुळे मुत्यू झाला आहे.76 जणावर सध्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान जत तालुक्यातील गेल्या पंधरवड्यात कमी झालेली कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढत आहे.त्यामुळे चिंता वाढली असून देशभरात कोरोनाची आलेल्या दुसऱ्या साथीच्या पार्श्वभूमीवर जतेत दक्षता घेणे गरजेचे आहे.