कंठीच्या धनाजी मोटेचा खून


जत,प्रतिनिधी : कंठी ता.जत येथील धनाजी मोटे नामदेव मोटे (वय 44) यांचा गोळ्या झाडून खून झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडीस आली आहे.कंठी गावातील मरगूबाई मदिंरासमोर हा थरार घडला आहे.घटनास्थळी बंदुकीच्या गोळ्या,दगड पडल्याचे समजते.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.मृत्तदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालय आणण्यात आला आहे. मोटे विवाहित असून त्यांना दोन मुलेही आहेत.मोटे यांच्यावरही अनेक ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.