जत तहसील कार्यालयासमोर अतिक्रमणामुळे जीवघेणी वाहतूक कोंडी

जत,प्रतिनिधी : जत शहरातील तहसील कार्यालयासमोर अतिक्रमणचा विळखा पडला आहे.थेट रस्त्यावर थाटलेले अतिक्रमण जीवघेणे ठरत असून या अतिक्रमणामुळे दसऱ्याच्या अगोदर एक भयानक अपघात होता होता वाचला.दोन महत्वाच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी अतिक्रमणे काढण्याचे आदेश देऊनही बांधकाम विभागाच्या मुर्दाड अधिकाऱ्यांनी याला अभय दिले आहे.

जत शहरातील महत्वाचा रस्ता असलेल्या जत- सांगली रस्त्यावरील पोलीस ठाणे ते छत्रपत संभाजी महाराज चौकापर्यत रस्त्याला खेचून खोकी,चहाचे गाड्याचा विखळा पडला आहे.अनेक वेळा अतिक्रमणे काढूनही जैसे थे स्थिती 
निर्माण झाली आहे.तालुक्यातील महत्वाची कार्यालये या मार्गावर असल्याने नागरिक वाहनाची मोठी गर्दी या मार्गावर असते.रस्त्याच्या कडेला अतिक्रमण धारकांनी थेट रस्त्यापर्यत अतिक्रमणे केली आहेत.अस्तावेस्त खोकी,छत यामुळे वाहतूकीला अडचणी ठरत आहेत.त्याशिवाय कार्यालयासमोर थाटलेले विद्रुपीकरण अब्रुचे लक्तरे मांडत आहेत.हॉटेलच्या घाणी घाण मुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

मोठा अपघात ठळला

तहसील कार्यालयासमोरून सांगलीकडे निघालेल्या एका काळीपिवळी भरधाव गाडीने सांगलीकडून येणाऱ्या इंडिका गाडीला धडक दिली.सुदैवाने काळीपिवळी गाडीचा वेग कमी झाला अन्यथा काळीपिवळी गाडीतील दहा,व इंडिका गाडीतील लोंकाना जीव गमविण्याची वेळ आली असती.


अधिकाऱ्यांची डोळ्यावर पट्टी

पंचायत समिती,जत तहसील कार्यालयासमोरचा हा भाग आहे.येथील वरिष्ठ अधिकारी यांचा मार्गावरून जा-ये करत आहेत.त्यांनाही या अतिक्रमणाचा अनुभव आला आहे.तरीही त्यांची छुप्पी व बांधकाम विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे झाकलेले डोळे कुणाचातरी नाहक जीव घेतल्याशिवाय उघडणार नाहीत.ऐवढे मात्र निश्चितजत तहसील कार्यालयासमोर होणारी जीवघेणी वाहतूक कोंडी