राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे जतचे साहय्यक निंबधक यांना निलंबित करण्याचे आदेश | विक्रम ढोणे यांच्या तक्रारीची दखलजत,तिनिधी : सहाय्यक निबंधक सहकारी संस्थाचे सहाय्यक निंबधक ए.एम.यशवंत जत येथे घेण्यात आलेल्या कृषी,सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या आढावा बैठकीला अनुउपस्थित राहिल्याचे युवा नेते यांनी मंत्री कदम यांच्या निर्देशनास आणताच त्यांचे तातडीने त्यांचे निलंबन करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांंना मंत्री कदम यांनी फोनद्वारे दिल्याची माहिती ढोणे यांनी संकेत टाइम्सशी बोलताना दिली.ढोणे म्हणाले,जत कार्यालयाचा पदभार असलेले यंशवत त्यांच्या कार्यालयात अपवादाने हजर असतात.त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत.भष्ट्राचाराबाबतचे गंभीर आरोपही यंशवत यांच्यावर झाले आहेत.शुक्रवारी जत येथे सहकार खात्याचे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या आढावा बैठकीचे आयोजन केले होते.सहकार संबधित महत्वाची बैठक असतानाही यंशवत अनुउपस्थित होते.बैठकीत याबाबत ढोणे यांनी मंत्री कदम यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.दरम्यान कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार यांनीही यंशवत यांच्याबाबत वस्तूस्थिती असल्याचे मंत्री कदम यांना माहिती दिली.मंत्री कदम यांनी बैठकीत वरिष्ठ अधिकारी यांना फोनवर यंशवत यांचे निलंबन करण्याचे आदेश देत सशक्त लोकप्रतिनिधीचे कार्यत्परता सिध्द केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.