जत तालुक्यात कोरोनाचा प्रभाव ओसरला

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात एकीकडे जोरदार पावसाचा धुमाकूळ सुरू असताना दुसरीकडे जीवघेणा ठरलेला कोरोनाचा प्रभाव कमी होत आहे. तालुक्यात गेल्या दोन दिवसात 17 एवढेच रुग्ण आढळून आल्याने दिलासा मिळाला आहे.तालुक्यात वाढलेला कोरोनाचा प्रभाव नाममात्र झाला आहे. दुसरीकडे पावसाने मोठे नुकसान झाल्याने चिंता वाढली आहे.पावसाचा जोर कायम राहिला आहे.


बुधवार, गुरूवाचे रुग्ण असे,जत 3,कोसारी 1,वज्रवाड 2,बालगाव 1,शेगाव 1,टोणेवाडी 1,डफळापूर 4,करेवाडी को.बो.2,धुळकरवाडी 1,व्हसपेठ 1,कुणीकोणूर 1,माडग्याळ 1,आतापर्यत 1534 रुग्ण संख्या झाली आहे.त्यातील 1341जण कोरोना मुक्त झाले आहेत.