जलबिरादरीकडून मिळालेल्या पोकलेन मशिनचा वाढदिवस

जत,प्रतिनिधी : जलबिरादरीने अग्रणी नदी खोरे येथील जलसंधारणाच्या कामासाठी दिलेल्या नवीन "पोकलेन मशीन"ला रवीवारी एक वर्ष पूर्ण झाले.या मशिनच्या माध्यमातून खलाटी व कोकळे गावात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे केली आहेत.या मशीनचा गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला.
4 सप्टेंबर 2019 रोजी जलबिरादरीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री.नरेंद्र चूग यांनी अग्रणी नदी खोर्यातील जलसंधारणाची कामे करण्यासाठी नवीन पोकलेन मशीन अग्रणी नदी खोऱ्यातील लोकांना उपलब्ध करून दिले.त्या नवीन मशीनला रविवारी एक वर्ष पूर्ण झाले. या मशिनद्वारे आग्रणी नदी खोऱ्यातील गावांमध्ये ओढ्याचे रुंदीकरण,तलावातील गाळ काढणे,बंधाऱ्यासाठी पाया काढणे,माती नालाबांध तयार करणे,वन जमिनीवरती डीप सी सी टी करणे,वनतळे करणे, शेतकऱ्यांना विहीर पुनर्भरणासाठी खड्डे करून देणे तसेच वृक्षारोपणासाठी खड्डे तयार करणे अशी अनेक प्रकारची कामे या एक वर्षांमध्ये कामे करण्यात आली आहेत.

सद्या ही मशीन खलाटी गावातील वनजमिनीवर डीप सी सी टी खोदण्याचे काम करीत आहे.कोकळे व खलाटी गावातील लोकांनी मिळून मशीनचा वाढदिवस पिंपळाच्या रोपाचे वृक्षारोपण करून साजरा केला.याप्रसंगी जलबिरादरी जिल्हा समन्वयक अंकुश नारायणकर,सागर साळुंके,बालाजी चव्हाण,कोकळे येथील सेवानिवृत्त मेजर पतंग पाटील खलाटी गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री नरेंद्र कोळी सिद्धार्थ पाटील तसेच कोकळे व खलाटी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.


जलबिरादरीकडून मिळालेल्या पोकलेन मशिनचा वाढदिवस वृक्षाचे रोपण करून साजरा करण्यात आला.