जत बाजार पेठेत थेट‌ रस्त्यावर फलक

जत,प्रतिनिधी : जत शहरातील मंगळवार पेठेत‌ील रस्त्यावर दुकानदारांनी दुकानाचे फलक‌ थेट रस्त्यावर ठेवत वाहतूकीस अडथळा निर्माण केला आहे.


शहरातील सर्वाधिक गजबलेला रस्ता असलेला महाराणा प्रताप चौक ते हनुमान मंदिर,हनुमान मंदिर ते‌ बिळूर चौक, व निलसागर चौक ते‌ बिळूर चौकापर्यत मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करत रस्त्याला धोका निर्माण केला आहे.त्यातच फळाचे गाडे,दुचाकी वाहने यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत आहे. 


आता त्यात‌ काही दुकानदारांनी थेट मोठ मोठे फलक रस्त्यावर ठेवत रस्ता गिंळकृत्त केला आहे.जत‌ नगरपरिषदेचे डोळे कधी उघडणार असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.जत‌ शहरातील मंगळवार पेठे येथे‌ मोठे फलक रस्त्यावर ठेवून वाहतूकीला अडथळा निर्माण केला आहे.