नळपाणी योजनाची कितीवेळा होणार चौकशी | पंधरा वर्षापासून भष्ट्राचार पडद्याआड : कागदपत्री योजना पुर्ण ; मुल्याकंन गरजेचे

0



जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील गावकर्‍यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या समन्वयाने जिल्हा परिषद मार्फत गावागावात ग्रामीण पाणी पुरवठा योजना करण्यात आल्या आहेत. या योजनांच्या देखभालीसाठी गावातच पाणी पुरवठा समित्या गठीत करण्यात आले. मात्र या समितीच्या पदाधिकार्‍यांनी आपले पोट भरण्यासाठी पाणी पुरवठा योजनांची पुरती वाट लावली आहे.








जत तालुक्यात गेल्या पंधरा वर्षात शंभरावर पाणी योजना झाल्या मात्र जवळपास सर्वच पाणी पुरवठा योजनांच्या विविध तक्रारी पंचायत समिती, जिल्हा परिषदेला दाखल झाल्या. तक्रारींची दखल घेत अधिकार्‍यांमार्फत चौकशी करण्यात आली. यात अनेक योजनांत आर्थिक अफरातफर, अनियमता आढळल्याने पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष, ठेकेदार ,सचिव व सदस्यावर कारवाईचा बगडा उगारला पंरतू गेल्या पाच वर्षापासून ना कारवाई झाली ना योजना सुरू झाल्या फक्त कागदी घोडे नाचविण्यात प्रशासनाने धन्यता मानली .मात्र 

गेल्या पंधरा वर्षात योजना झालेल्या अनेक गावात शासनाला टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे.तरीही योजना पुर्ण नाहीत.ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषदेमार्फत गावागावात पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्या आहेत. 







त्यातील सर्वच योजना वादाने ग्रासलेल्या आहेत काही बोटावर मोजण्याएवढ्या योजना सध्या सुरू आहेत तर बाकी योजना कामे रखडल्याने बंद आहेत.जेथे योजना आहेत ती गावे तर गेल्या दहा वर्षोपासून पिण्यासाठी टाहो फोडत आहेत. त्या गावाना जर वर्षी टँकरच्याच पाण्यावर अवलबून रहावे लागत आहे.टँकरच्या पाण्याला मर्यादा पडतात.जर वर्षी उन्हाळ्यात परिस्थीती जैसेथे असते. योजनेमध्ये कोणत्याही समस्या उद्भवल्यास त्या दूर करण्यासाठी पाणी पुरवठा समिती गावात गठीत करून पदाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र पदाधिकार्‍यांनी नळपाणी योजनेत विविध समस्या दाखवून मोठा गैरव्यवहार केला आहे. विशेष म्हणजे या नळ योजना सन 2005 नंतर सुरू झाल्या आहेत. यातील अनेक नळ योजनांना पंधरा वर्षाचा कालावधी उलटला तरीही सुरू झालेल्या नाहीत. 









योजनाना लाखो निधी खर्च झाला आहे, मात्र समिती पदाधिकार्‍यांनी या निधीचा दुरूपयोग करून स्वत:चेच पोट भरण्याचे काम केल्याने योजनेमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी गावकर्‍यांनी जिल्हा परिषदेकडे केल्या आहेत. या कामाची चौकशी करण्यात आली.चौकशीच्या नावाने प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही, परिणामी पाणी योजना गेल्या पंधरा वर्षोपासून पुर्ण होतायेतच.


Rate Card







पुन्हा चौकशी समितीचा घाट


मुळात तालुक्यातील प्रधानमंत्री,पेयजल योजनेत भष्ट्राचार झाल्याचे अनेकवेळा स्पष्ट झाले आहे.तपासणी,चौकशाही झाल्या आहेत.तरीही जवळपास सर्वच गावातील योजना सध्याही बंद स्थितीत आहेत.त्या चालू करून नागरिकांना पाणी देण्याची जबाबदारी असणारा जिल्हा,तालुकास्तरीय पाणीपुरवठा विभाग करतोय तरी काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.नव्याने तपासणीनंतर तर योजना चालू होणार काय याबाबत सांशकता निर्माण झाली आहे.








चौकशी नंतर मोठी पाकिटे दिल्याची चर्चा


जत तालुक्यात यापुर्वी या योजनाच्या झालेल्या तपासणीत मोठ्या प्रमाणात अनियमितता,भष्ट्र कारभार झाल्याचे समोर आले आहे.मात्र चौकशी समितीला वजनदार पाकिट दिल्याने या योजना तत्कालीन तपासणीत सुरू असल्याचे कागद रंगविण्यात आल्याचे आरोप आहेत.मात्र प्रत्यक्षात योजना आजही बंद आहेत हे विशेष..



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.