राज्यमंत्री विश्वजीत कदम आज करणार | डफळापूरातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

डफळापूर,वार्ताहर : डफळापूर ता.जत येथे गेल्या चार दिवसात पडलेल्या तूफान पावसामुळे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आज या परिसरातील नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी कृषी,सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम पाहणी करणार आहेत.त्यांच्यासोबत आमदार विक्रमसिंह सांवत व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मागास असलेल्या खरीपातील बाजरी,मटकी,मका पिके पाण्याखाली गेली आहेत.त्याशिवाय ऊस पिक आडवे झाले आहेत.त्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.ऑक्टोंबर फळ छाटणी केलेले द्राक्ष,डाळींब पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.सातत्याने पावस होत असल्याने दावण्या,करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.जत पश्चिम भागातील नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बाजार समिती संचालक अभिजित चव्हाण यांनी केली आहे.
दरम्यान आज कृषी,सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्याकडून डफळापूरातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करणार आहेत.डफळापूर ता.जत येथील मका पिक पाण्यात गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.