दरिबडचीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आ.सांवत भेट घेणार

दरिबडची, वार्ताहर : जत तालुक्यात गेल्या आठवड्यात धुँवाधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीते नुकसान झाले आहे.आमदार विक्रमसिंह सांवत आजपासून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करणार आहेत.जत तालुक्यातील जवळपास सर्वच भागात गेल्या चार दिवसात झालेल्या तूफान पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.खरीप हंगामातील बाजरी,मका,तुरीसह द्राक्ष,डांळिब बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांचे यामुळे कंबरडे मोडले आहे.
यापार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंत पाटील,कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी तालुक्यातील कुडणूर,डफळापूर,येळवी,अचनकहळ्ळी भागातील नुकसानीची पाहणी केली आहे. त्याचबरोबर तालुक्यातील अन्य गावातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आजपासून आमदार सांवत दौरा करत आहेत.आज दरिबडची परिसरातील गावांतील शेतकऱ्यांची आमदार सांवत भेट घेणार आहे.