संख येथे जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई

संख,वार्ताहर : जत तालुक्यात उमदी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या संख येथे जुना एस टी स्टॅन्ड परिसरात पैसे लावून पत्त्यांचा डाव खेळणाऱ्यां चौघांवर कारवाई करण्यात आली.यावेळी त्यांची झडती घेतली असता रोख चार हजार एकाहत्तर रुपये हस्तगत करण्यात आले. उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  दत्तात्रय कोळेकर यांच्या मार्गदर्शना खाली संख दुरक्षेत्र येथे पैसे लावून पत्यांच्या डावात जुगार खेळणाऱ्या चौघांवर ही कारवाई करण्यात आली. चनाप्पा सत्याप्पा तेली वय 35 वर्ष,अशोक तुकाराम कोळी(वय 22) परशुराम  यल्लाप्पा कांबळे (वय 43), सिध्दाप्पा चेनाप्पा घाळी (वय 43,सर्वजण रा. संख)यांना ताब्यात घेऊन त्यांचे पंचांसमक्ष झडती घेतली असता त्यांच्या कडून 4,071 रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आले.