बेंळूखी सोसायटीच्या चेअरमनपदी सुरेश अथणी,व्हा.चेअरमन म्हाळाप्पा अनुसे

डफळापूर,वार्ताहर : बेंळूखी ता.जत येथील सर्व सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सुरेश शंकर अथणी यांची तर व्हा.चेअरमनपदी म्हाळप्पा धर्मा अनुसे यांची बिनविरोध निवड झाली.साडेतीन वर्षापुर्वी बेंळूखी सोसायटीची निवडणूक झाली होती.पँनेल प्रमुख सुधाकर माळी,पै.लक्ष्मण माळी यांच्या नेतृत्वाखाली पँनेलने सोसायटीवर सत्ता मिळविली होती.प्रांरभी महादेव ज्ञानू माळी यांना चेअरमन,तर नानासो शामराव चव्हाण यांना व्हा.चेअरमनपदी संधी मिळाली होती.गेल्या साडेतीन वर्षात सोसायटीत मावळते चेअरमन महादेव माळी यांनी प्रभावी काम करत सोसायटीचा नावलौकिक निर्माण केला आहे. तो कायम राखण्याचे आवाहन नुतन चेअरमन सुरेश अथणी यांच्यासमोर आहे.सोमवार ता.19 रोजी जत सहाय्यक निंबधक कार्यालय जत येथे ही निवड करण्यात आली.यावेळी सदस्य महादेव अथणीकर,प्रविण शिंदे,स्वप्निल माळी,नामदेव चंदनशिंवे,वनिता माळी,शांताबाई चव्हाण उपस्थित होते.यावेळी शशिकांत चव्हाण, मनोहर चव्हाण,मारूती माळी,संजय आ. पाटील,नेताजी बाबर,राजू चव्हाण, रमेश चव्हाण,बिरूदेव अनुसे,शंकर चौगुले,धनाजी माळी,शिवाजी माळी,चिंदानंद अथणीकर आदी मान्यवर उपस्थित होते.