लकडेवाडीत फुलवली लालभडक ड्रँगनची बाग | सोन्याळच्या पुजारी बंधूनी केला यशस्वी प्रयोग;पारंपरिक शेतीला दिला फाटा

0

सोन्याळ,वार्ताहर : जत -मंगळवेढा तालुक्यातच्या सिमावर्ती भागातील कायमस्वरूपी दुष्काळी आणि खडकाळ माळरानावर अथक परिश्रमानंतर नंदनवन फुलवत सोन्याच्या चंद्राम पुजारी व अवण्णा पुजारी या बंधूनी ड्रॅगनफ्रुट फळ लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे.व्यवसायिक शेतीचा अत्याधुनिक तंञज्ञान वापरत केलेल्या शेतीतून लाखो रुपयाचे उत्पादन मिळू लागले आहे.






ड्रँगनफ्रुट अगदी नावही नव असलेल्या या फळाला जतच्या अशा कष्ठाळू शेतकऱ्यांनी वेगळ्या उंचीवर नेहले आहे.सध्या हे फळ लोकप्रिय झाले आहे.मुळ सोन्याळच्या पुजारी बंन्धूनी लकडेवाडी हद्दीतील अडीच एकर जमिनीत ठिबक सिंचनावर ड्रॅगन फ्रुटची लागवड केली आहे. कमी पाणी, कमी खते, कमी खर्च आणि विशेष म्हणजे बाजारात हमखास मागणी असलेले पीक घेऊन या भागातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्श घालून दिला आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये नाविन्याचा ध्यास आणि शेतीला आधुनिकतेची जोड देऊन पुजारी बंधूनी यांनी मोठ्या धाडसाने ड्रॅगन फळ पिकाची लागवड यशस्वी केली आहे.






सोन्याळ पासून तीन किलोमीटरवर लकडेवाडी येथे चंद्राम लायप्पा पुजारी यांची शेती असुन, त्यांनी पुर्वापार चालत आलेल्या शेती फाटा देत आधुनिक शेती करायची या उद्देशाने पुजारी बंन्धूनी पुणे येथून ड्रँगनची फळरोपे आणत लागवड केली आहे. आता त्यातील दीड एकराचे शेत ड्रँगन फ्रुटच्या फळानी बहरला आहे. पावसाचे प्रमाण कमी आणि हिवाळाही कमी असल्याने येथे पारंपरिक पद्धतीनेच शेती केली जाते.ज्वारी,बाजरी,मका,कडधान्याची शेती या भागात घेतली जात आहे.पुजारी यांनी केलेली डाळिंबात मोठे नुकसान झाल्याने त्यांनी वेगळे काहीतरी करत ड्रँगन फ्रुट लागवड केली आहे.

2017 ला या पिकांची लागवड घेतली आहे.

कमी पाण्यात,औषध फवारण्या आणि रासायनिक खतांचा वापर न करता हे पीक येत असल्याने त्यांनी पहिल्यांदा दीड एकरावर 11 फूट रुंद व 7 फूट लांब अशा अंतरावर रोपांची लागवड केली.






पहिल्यांदा दीड एकरात व नंतरहुन एक एकरात ड्रॅगनची लागवड केली.अडीच एकर ड्रँगनची लागवड करण्यासाठी रोपे, सिमेंटची चौकोनी ठोकळा,सिमेंट खांब, ठीबक सिंचन याचा एकंदरीत पाच लाख रुपये खर्च आला.यानंतर होणारा खर्च

Rate Card

पाण्याची मोठी समस्या होती.पाण्यासाठी कूपनलिका काढली. कूपनलिकेला कमी पाणी असल्याने शेततळे तयार करून ठिबक संचचा वापर केला आहे.सध्या ड्रँगची लालभडक फळे आकर्षण ठरले आहेत. मागणीही वाढल्याने या वर्षीही उत्पादनात वाढ होणार आहे. कोरडवाहू,कमी पाण्यात ड्रँगनफ्रुट शेतीचा प्रयोग कसा यशस्वी करायचा यांचे उत्तम उदाहरण पुजारी बंन्धूनी उभा केलेली ड्रँगन फ्रुट शेती ठरत आहे.

 







पारंपरिक पिकांना फाटा दिला


परपंरागत शेतीतून येणारे उत्पादन मर्यादित राहत असल्याने वेगळा प्रयोग करायचा ठरवत आम्ही ही ड्रँगन फ्रुटची बाग उभी केली आहे. कमी पाणी,रोगांची भिती नाही,खताचे अत्यल्प प्रमाण यामुळे या पिकांची माहिती घेत ही शेती फुलविली आहे.यंदा फळाची संख्या वाढल्याने उत्पादनही समाधान व्यक्त होत आहे.







सोन्याळ ता.जत येथील पुजारी बंन्धूनी लकडेवाडीत फुलविलेली ड्रँगनबाग

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.