80 वर्षाच्या वृध्दाची कोरोनावर यशस्वी मात | जत कोविड सेंटरमधील डॉक्टरांचे प्रयत्न सफल

0

जत,प्रतिनिधी : जत कोविड सेंटर येथे प्रंचड प्रकृत्ती खालावेल्या 80 वर्षाचे वयोवृद्ध कोरोनाग्रस्तावर योग्य उपचार करत कोरोना मुक्त करण्याची कामगिरी जत कोविड सेंटर मधील डॉक्टरांनी केली आहे.









जत शहरात विश्रामगृहा नजिकच्या वस्तीगृह स्थापन झालेले जत कोविड सेंटर रुग्णांना जीवनदायिनी ठरत आहे.

अत्यंत क्रिटिकल रुग्णावरही येथे यशस्वी अल्पदरात उपचार करण्यात येत आहेत.









डफळापूर येथील एक 80 वर्षाचे वयोवृध्दाची कोरोनामुळे प्रकृत्ती 

Rate Card

प्रंचड खालावली होती.ऑक्सीजनचे प्रमाण अगदी 35-40 पर्यत खाली आले होते.ह्रदयापर्यत कोरोनाचे विषाणूचा संसर्ग झाल्याने वृध्दाची बचावण्याची शक्यता धुसर होती.अशा स्थितीत दाखल झालेल्या या वृध्दावर जत कोविड हॉस्पिटल येथे उपचार सुरू करण्यात आले.कृत्रिम ऑक्सीजन (व्हेंटीलेटर)लावण्यात आला.चार दिवसानंतर नव्या कोविड 19 मार्गदर्शिकांचा अवलंब करत त्याच्यांवर उपचार करण्यात आले.









जत कोविड सेंटरमधील तज्ञ फिजीशयन डॉ.शरद पवार व डॉ.शालीवाहन पट्टणशेट्टी,कन्स्लंट,मेडिकल ऑफिसर, व कर्मचाऱ्यांनी योग्य काळजी घेत वृध्दाचे मनोधैर्य वाढवत त्यांना 11 दिवसानंतर कोरोना मुक्त करण्यात यश मिळविले.दरम्यान वृध्दाचा मुलगा यांनी कोविड सेंटरमधील सर्वाचे शतशं आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली. 

जतचे कोविड सेंटर कोरोना रुग्णांना वरदान ठरत आहे.अगदी अल्पदरात येथे उपचार करण्यात येत आहेत.







जत कोविड सेंटर येथील यशस्वी उपचारानंतर कोरोनामुक्त करणाऱ्यां डॉक्टरांना गणेश मुर्ती भेट देत आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.