जत तालुक्यात 23 नवे रुग्ण,आणखीन दोघाचा मुत्यू

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात पुन्हा नवे 23 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात खैराव येथे तब्बल 14 रुग्ण आढळले आहेत.दुसरीकडे आणखीन दोघाचे मुत्यू झाले आहेत.तर 14 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

तालुक्यातील कोरोना प्रभाव एकीकडे कमी,अधिक होत असताना कोरोनामुळे मुत्यू होणारी संख्याही सातत्याने वाढत आहेत.


शुक्रवारी खोजानवाडी 3,उमदी 3,बालगाव 2,उटगी 1,खैराव 14 येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत.