जत एसटी आगाराचे 14 कर्मचारी पॉझिटिव्ह


जत,प्रतिनिधी : जतमध्ये रविवारी आलेल्या कोरोना तपासणी अहवालात बेस्टसाठी गेलेले 40 कर्मचाऱ्या पैंकी 34 जणांची तपासणी करण्यात आली.त्यात 14 जणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबंळ उडाली आहे.

राज्यभरातून बेस्टच्या बसेससाठी कर्मचारी मागविण्यात आले आहेत.सांगली जिल्ह्यातूनही असे कर्मचारी मागविण्यात आले होते.जतमधून दहा दिवसासाठी 40 जणाची एक तुकडी मुंबईतील बेस्टच्या बसेस चालविण्यासाठी गेले होते.ते पंधरा दिवसानंतर रविवारी माघारी परतले.त्यात त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली.दरम्यान यामुळे जत आगाराचे नियोजन विस्कळीत होणार आहे.


 दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्यांना जत आगाराच्या अधिकाऱ्यांकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.उर्वरित सहा जणांची आज तपासणी करण्यात येणार आहे.