वायरमन लहू पवार यांचा सोन्याळ ग्रामपंचायततर्फे सत्कार

सोन्याळ,वार्ताहर : जत तालुक्यातील सोन्याळ येथील वायरमन (तंत्रज्ञ) लहू पवार  यांची त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात विनंतीवरून बदली झाली आहे. सहा वर्षांच्या कालावधीत पवार यांनी विनातक्रार आणि विनम्र सेवा बजावत चांगली कामगिरी केली आहे.

सोन्याळ आणि लकडेवाडी गावासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल त्यांचा ग्रामपंचायत सोन्याळ, सर्व सेवा सहकारी सोसायटी व विविध संघटनेकडून सत्कार करण्यात आला.वायरमन लहू पवार यांनी लॉकडाऊनच्या काळात अखंडित वीज सेवेसाठी अविश्रांत प्रयत्न करत सामाजिक बांधिलकी जपत काम केले आहे. 

पवार यांना कोरोना योद्धा म्हणूनही ग्रामपंचायत सोन्याळ कडून सन्मान करण्यात आले. यावेळी सरपंच पती जक्कु निवर्गी, सदस्य विजयकुमार बगली,हणमंत पुजारी, गाव तंटामुक्त अध्यक्ष विठ्ठल बिरादार,माजी सरपंच कलाप्पा शिंगे, सैफद्दीन नदाफ आदी उपस्थित होते. सोन्याळ सर्वसेवा सोसायटीतर्फे पवार यांचा शाल श्रीफळ व फेटा बांधून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संतोष पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आले.यावेळी सुरेश तेली,अशोक बिरादार, माजी उपसरपंच सिद्धाप्पा पुजारी, वाशिम नदाफ आदी उपस्थित होते. काष्ट्राईब कर्मचारी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष लखन होनमोरे यांनीही संघटनेच्या वतीने पवार यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.सोन्याळ वीज उपकेंद्राचे अवणणा पुजारी,राजू दळवाई, श्रीमंत कलगुंडे,विठ्ठल सनाळे, मंजुनाथ होनमोरे उपस्थित होते. 


सोन्याळ येथे वायरमन लहू पवार यांचा बदलीनिमित्त जक्कु निवर्गी, विजयकुमार बगली यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.