भिकवडी येथील अकरा वर्षिय मुलगाही कोरोना बाधित जिल्हाधिकारी


सांगली : आमहदाबादवरून आलेल्या साळशिंगी येथील कोरोना बाधित महिलेचा सहप्रवासी असणारा कडेगाव तालुक्यातील भिकवडी येथील अकरा वर्षीय मुलाचा कोरोना चाचणी अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. हा मुलगा कोरोना बाधित महिलेच्या संपर्क तपासणीमध्ये कडेगाव येथे इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन करण्यात आला होता. या मुलाचा स्वाब तपासणीसाठी घेण्यात आला होता. त्याचा अहवाल मध्यरात्री प्राप्त झाला असून हा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
सद्यस्थितीत उपचारा खालील एकूण रुग्णांची संख्या 14 झाली आहे.