ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्थेच्या पाठपुराव्याला यश | जत तालुक्यात रोजगार हमीची कामे सुरू होणार

पुणे : ६० हजार मजुरांच्या हाताला ...

जत,प्रतिनिधी : येळवी येथील ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्थेच्यावतीने तहसीलदार सचिन पाटील,गटविकास अधिकारी धरणगुत्तीकर यांना संस्थेचे सचिव तथा ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील यांनी सध्या कोविड -19 आजाराची साथ पसरली असून मजूरांना काम उपलब्ध करून देण्यासाठी तसेच रोजगार हमीची कामे चालू करण्याबाबत निवेदन दिले होते.


या निवेदनाची दखल घेत वन क्षेत्रांमध्ये सलग समतल चर खुदाईच्या कामासाठी प्रशासकीय पातळीवर काम मंजूर करून काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश येळवी ग्रामपंचायती सह इतर ग्रामपंचायतीला देण्यात आले आहेत.
या कामासाठी ग्रामपंचायत मध्ये 100 मजूरांनी कामाची मागणी ऑनलाइन स्वरूपात केली असून फॉर्म भरण्याची प्रक्रिया संपूर्णपणे ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्थेकडून करण्यात आली होती.गावातील गरजू लोकांसाठी तसेच युवकांच्या हाताला काम मिळवून देण्याचा ओंकार स्वरूपाचा हा छोटासा प्रयत्न करत आहोत,अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दीपक अंकलगी, सचिव तथा ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील यांनी दिली.