मोटेवाडीत घराला आग,तीन लाखाचे नुकसानसंख,वार्ताहर : मोटेवाडी  ता.जत येथील दशरथ नागू मोटे यांच्या राहत्या घर वजा छप्पराला अचानक आग लागल्याने घर जळून तीन लाखाचे नुकसान झाले.यात,संसारोपयोगी साहित्य,ज्वारी चार पोती, बाजरी दोन पोती, गहू एक पोत, दोन पोती हरभरा,रोख रक्कम 50 हजार, सोने तीन तोळे,सहा भारचांदी आणि,औषध दुकानाची कागदपत्रे असे सुमारे 3 लाखाचे नुकसान झाले.सुदैवाने कोणतेही जिवित हानी झाले नाही.
घरातील साहित्य काडताना दशरथ मोटे त्यांची पत्नी लळाबाई मोटे यांना किरकोळ भाजले आहे.
घराचे जळाल्यामुळे मोटे यांचा संसार उघड्यावर आला आहे.घटनास्थळी गावकामगार तलाठी यांनी भेट देऊन पंचनामा केले.