घरवाटणीच्या वादातून पुतण्याने केला चुलत्याचा खून | तासगाव तालुक्यातील कुमठे येथील धक्कादायक घटना


तासगाव : तासगाव तालुक्यातील कुमठे येथे चुलत्याचा पुतण्याने गळ्यावर धारदार कोयत्याने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली.भीमराव तुकाराम गाडे (वय 55) असे मृत चुलत्याचे नाव आहे.गेल्या अनेक दिवसापासून घरवाटणीच्या कारणाने त्यांच्यात वाद होता
मृत भीमराव गाडे आणि त्यांचा पुतण्या रोहित उर्फ बाला गजानन गाडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता.त्या वादातून झालेल्या वादावादीतून चिडून पुतण्याने चुलत्याचा कोयत्याने गळा चिरत खून केला.