सलीम गंवडी यांच्याकडून रमजान किटचे वाटपडफळापूर,वार्ताहर : अल्पसंख्यांक कल्याण समितीचे सदस्य सलीम गंवडी यांच्याकडून डफळापूरातील गरजू मुस्लिम बांधवांसह ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना रजमाज ईदच्या किटचे वाटप केले.
कोरोना मुळे मुस्लिम समाजातील अनेक नागरिक,मजूर अडचणीत आले आहे.सध्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र कामे बंद असल्याने त्यांच्या हाताला काम नाही.

त्यामुळे रमजान या पवित्र महिन्यात त्यांना हातभार म्हणून या किटचे वाटप करण्यात आले आहे.त्यात काजू,बदाम,पिस्ता,खजूरासह अनेक वस्तूचा समावेश आहे.युवक नेते परशुराम मोरे,श्री.गंवडी,सलीम पाच्छापूरे, राजू माळी,कॉ.हणमंत कोळी,शौकत नदाफ यांच्याहस्ते या किटचे वाटप करण्यात आले.

डफळापूर ता.जत येथे रमजान किटचे वाटप करण्यात आले.