जत | कमल आर्थोपिडिक सेंटरमध्ये महात्मा जोतिराव फुले आरोग्य योजनेस सुरूवात


जत,प्रतिनिधी : येथील कमल आर्थोपिडिक सेंटर येथे महाराष्ट्र शासनाची महात्मा जोतिराव फुले आरोग्य योजना लवकरचं सुरु होणार असल्याची माहिती डॉ.कैलास सनमडीकर यांनी दिली.

गेल्या अनेक वर्षापासून सुरु असलेल्या कमल आर्थोपिडिक सेंटरमध्ये जत तालुक्यातील रुग्णावर माफक दरात उपचार केले जात आहेत.डॉ.सनमडीकर यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र शासनाची महात्मा जोतिराव फुले आरोग्य योजना लवकरचं सुरू होत आहे. 
या योजनेत लाल व पिवळ्या रेशनकार्ड धारकांना पुर्णपणे मोफत उपचार मिळणार आहे.आर्थो.सर्जरीही पुर्णपणे मोफत केली जाणार असल्याने गरजु लोकांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन डॉ.कैलास सनमडीकर यांनी केली आहे.