डॉक्टरांनी आरोग्यदूत म्हणून काम करावे ;अँड.चन्नाप्पाण्णा होर्तीकर | जत पूर्वभागातील डॉक्टरांना पीपीई किटचे वाटप

0
Rate Card

सोन्याळ,वार्ताहर ; गाव पातळीवर आरोग्य कर्मचाऱ्यासह सरपंच, ग्रामसेवक,आशासेविका, पोलिस अधिकारी,कर्मचारी,आदींनी आपआपल्या परीने आणि जबाबदारीने काम करीत आहेत.तरीसुद्धा आपल्या भागात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून प्रत्येकाने  सजग राहून आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी आरोग्यदूत म्हणून  चांगले काम करावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्य प्रदेश सदस्य ऍड चन्नप्पाणणा होर्तीकर यांनी केले. कोरोनाच्या प्रादुर्भावात आपल्या जिवाची पर्वा न करणाऱ्या डॉक्टरांना त्यांची स्वतःची काळजी घेण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही अशा जत तालुक्यासह पूर्वभागातील डॉक्टरांच्या सेवेची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या वतीने माडग्याळ आणि उमदी येथे आयोजित पीपीई किटचे वितरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उमदी,संख जाडरबोबलाद जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व खाजगी डॉक्टर्स उपस्थित होते.

यावेळी बोलताना अँड.चन्नाप्पाण्णा होर्तीकर म्हणाले की, जत पुर्व भागात मोठी जोखीम स्वीकारुन डॉक्टर काम करत आहेत. ग्रामीण भागात काम करत असताना डॉक्टरांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.अशा कठीण परिस्थितीत देखील ते काम करत असल्याने जलसंपदा मंत्री जंयत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व डाँक्टरना आगोदर फेसशिल्ड  आणि आत्ता पीपीई किटचे वाटप करण्यात येत आहे. तसेच डॉक्टरांच्या सर्व समस्या पालकमंत्री जंयत पाटील यांच्या माध्यमातून सोडवल्या जातील.देशात कोरोना विषाणूचा उद्रेक होत असून त्‍याला वेळीच आळा घालण्‍यासाठी सोशल डिस्‍टन्सिंग प्रमाणेच वैद्यकीय उपचारांची गरज भासणार आहे. 

सुदैवाने परिस्थिती सध्‍या नियंत्रणात आहे. मात्र, भविष्‍यात विपरित परिस्थिती उद्भवली तर सर्वच यंत्रणांनी सज्‍ज असणे गरजेचे आहे.कोरोनाचा वाढता प्रादुभाव आणि त्यामूळे आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण यातून सावरण्यासाठी व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या सुरक्षतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभर आवश्यक साहित्य वाटप करण्यात येत आहे.नागरिकांनी प्रशासकिय व आरोग्य यंत्रणेला समाजाने सहकार्य करुन योग्य नियमांचे पालन करणेही आवश्यक असल्याचे मत होर्तीकर यांनी व्यक्त केले. 

यावेळी राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे तालुका उपाध्यक्ष फिरोज मुल्ला,माजी उपसभापती रेवप्पा लोणी, सिद्दनगौडा पाटील, सुभाष पाटील,शिवलिंग पाटील, रवी शिवपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले. डॉ प्रदीप शिंदे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक तर डॉ चंद्रशेखर हिट्टी यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ.लोणी, डॉ.रविंद्र हत्तळी, डॉ. राहुल पाटील,आरोग्य अधिकारी बी.टी.पवार, डॉ.राजकुमार भद्रगोंड, डॉ. चंद्रमणी उमराणी,डॉ.महादेव जाधव, डॉ.श्रीनिवास कुलकर्णी,डॉ.शिवानंद बगली,डॉ.सौ शिवमाला हिट्टी,डॉ. सौ.अर्चना जाधव, डॉ सौ स्मितांजली उमराणी,डॉ.काशिनाथ उमराणी,डॉ.बुद्धिहाळ,डॉ.चिदानंद सुतार आणि पत्रकार संघटनेचे तालुका उपाध्यक्ष राहुल संकपाळ,लखन होनमोरे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.