बिळूरमधील स्वस्त धान्य दुकानची पाहणीजत,प्रतिनिधी : बिळूर ता.जत येथील स्वस्त धान्य दुकानची संरपच नागनगौडा पाटील यांनी पाहणी केली.
गावातील रेशनकार्ड धारकांना धान्य व्यवस्थित मिळते का ?,मोफत तांदूळ व्यवस्थित दिला जातो का ? शासकीय रक्कमेनुसार धान्य वितरण केले जाते का यांची पाहणी केली.


सध्या कोरोना लॉकडाऊन काळात नागरिकांना शासनाने दिलेले स्वस्त धान्य व्यवस्थित दिले जावेत,नोंदणी असलेला कोणताही नागरिक या योजनापासून वंचित राहू नये यांची काळजी द्यावी,अशा सुचना स्वस्तधान्य दुकानदारांना संरपच पाटील यांनी दिली.यावेळी काही कार्डधारकांना धान्य वाटपही केले.


बिळूर ता.जत येथील संरपच नागनगौंडा पाटील यांनी स्वस्त धान्य दुकानाची पाहणी केली.