पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले तालुक्यातील डॉक्टरांना पीपीई किटजत,प्रतिनिधी ; राज्याचे जलसंपदामंत्री व सांगली जिल्हा पालकमंत्री ना जयंत पाटील यांच्याकडुन कोरोना विषाणूच्या लढ्यात लढा देणाऱ्या डाॅक्टरांच्या सुरक्षिततेसाठी जत तालुक्यातील डॉक्टरांना पी.पी.ई कीटचे वाटप करणेत आले.जत येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेबबापू पाटील, विशेष कार्य अधिकारी अमोल डफळे, राजारामबापू दुधसंघ संचालक शशिकांत पाटील, यांच्या हस्ते कीटचे वाटप करणेत आले.
यावेळी बोलताना बाळासाहेब पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील खाजगी दवाखाने हे नियमित पणे चालु रहावेत या विचाराने ना.जयंत पाटील यांनी पी. पी. ई. कीट उपलब्ध करून दिले. जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांना फेसशिल्ड व पी. पी. ई कीटची उपलब्धता होईल.
डॉक्टर असोसिएशनच्या वतीने पी. पी. ई कीट व फेसशिल्ड मास्क दिल्याबद्दल पालकमंत्री ना. जयंत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आभार माणण्यात आले.
यावेळी  सुरेश शिंदे, जत तालुका अध्यक्ष बसवराज दोडमणी,अँड.चन्नाप्पा होर्तीकर, रमेश पाटील, उत्तम चव्हाण,सिद्धुआण्णा शिरशाड,उपनगराध्यक्ष आप्पा पवार,डाँ.पराग पवार , मिनाक्षी आककी, सुभाष पाटील, जे.के.माळी आदी मान्यवर उपस्थित होते.


जत येथे डॉक्टरांना पीपीई किटचे वाटप करण्यात आले.