जतमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साधेपणाने साजरीजत,प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर व जत पोलिसांच्या आवाहन नुसार जत शहरात संभाजी महाराज यांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. 
शहरातील संभाजी चौक येथे दरवर्षी संभाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते. तसेच विविध उपक्रम राबविले जात होते. मात्र सोशल डिस्टन्सिंग व लॉकडाऊनमुळे जयंती साधेपणाने साजरी करावी,अशी विंनती प्रशासनाने केली होती.त्यांच्या आवाहनानुसार छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सामाजिक व शारिरीक अंतर ठेऊन करण्यात आले. श्रीकांत सोनवणे,श्रीशैल बिराजदार, शशिकांत शिनगारे, आकाश बनसोडे, दिनेश जाधव, शशिकांत जाधव आदी उपस्थित होते. जयंती साजरी न केल्याने त्याचा खर्च सामाजिक उपक्रमासाठी खर्च करण्यात येणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.