अंकले | हद्दीत कंटेनमेंट आराखड्याची अंमलबजावणी : जिल्हाधिकारी

0

सांगली : सांगली जिल्हयातील जत तालुक्यातील मौजे अंकले गावच्या हद्दीत एकाची कोरोना चाचणी  पॉझीटीव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे, 1) अंकले गावचे पुर्वेचे बाजू रस्त्यावरील राजू चौगुले यांच्या द्राक्ष बागेपर्यंत 2) अंकले गावचे आग्नेय दिशेला डफळापूर रस्त्यावरील गौतम कांबळे यांचे घरापर्यंत 3) अंकले गावचे दक्षिणेकडे फिरंगु धोंडु पाटील यांचे घरापर्यंत 4) अंकले गावाचे नैऋत्येकडे बसाप्पावाडी रस्त्यावरील बाळासो पराप्पा दुधाळ यांचे घरापर्यंत 5) अंकले गावचे पश्चिमेकडे इरळी रस्त्यावरील लक्ष्मण गुंडा पुजारी यांचे घरापर्यंत 6) अंकले गावाचे वायव्येकडे ढालगाव रस्त्यावरील संभाजी चंदनशिवे यांचे वस्तीपर्यंत 7) अंकले गावाचे उत्तरेकडे हिवरे रस्त्यावरील महादेव पांडुरंग दुधाळ यांचे शेततळ्यापर्यंत असा आहे. 

Rate Card

बफर झोन पुढीलप्रमाणे,1) अंकले गावाचे पूर्वेकडे बाजू रस्त्यावरल म्हैसाळ पोट कालव्यापर्यंत 2) अंकले गावाचे अग्नेय दिशेला डफळापूर रस्त्यावरील भोकर चौंडी तलावा जवळील भारत दुधाळ यांचेवस्ती पर्यंत 3) अंकले गावाचे नैऋुत्येकडील बसाप्पावाडी रस्त्यावरील वगरे वस्तीजवळील औढ्यापर्यंत 4) अंकले गावाचे पश्चिमेकडे इरळी रस्त्यावरील यमगर पुणेकर यांचे वस्तीपर्यंत 5) अंकले गावाचे वायव्येकडे ढालगाव रस्त्यावरील म्हैसाळ पोट कॅनॉलपर्यंत 6) अंकले गावाचे उत्तरेकडे हिवरे रस्त्यावरील रेड्डी स्टोन क्रशरपर्यंत असा आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.