रोटेशन पध्दतीने अखेर दुकाने सुरू | जत नगरपरिषदेची शिथिलता ; पहिल्याच दिवशी 3 दुकाने सीलजत,प्रतिनिधी : जत शहरातील अखेर दोन महिन्यानंतर नगरपरिषदेच्या वतीने दिलेल्या आदेशानुसार रोटेशन पध्दतीने एका भागातील संपुर्ण दुकाने सुरू करण्यात आली. कोरोनोमुळे झालेल्या लॉकडाऊन नंतर शहरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली होती.त्यानंतर जीवनावश्यक वस्तूची दुकाने  व वैद्यकीय सेवा सुरू होत्या.बाकी दुकाने लॉकडाऊन होती.केंद्र,राज्य शासनाने चौथ्या लॉकडाऊनमध्ये दिलेल्या शिथिलतेनुसार शहरातील रोटेशन पध्दतीने दररोज एका भागातील सर्व दुकाने सोशल डिस्टन्सिंग, सँनिटायझर काटेकोर वापर करत सुरू  करण्यास मुभा देण्यात आली आहे.आज मंगळवारी त्यांची सुरूवात करण्यात आली.लोंखडी पूल ते मारूती मंदिर पर्यतची दुकाने मंगळवारी सुरू होती.आज मारूती मंदिर ते बनाळी चौक येथपर्यतची दुकाने चालू करण्यात येणार आहेत.
सर्व दुकानदारांनी नगरपरिषदेने दिलेल्या आदेशानुसार सोशल डिस्टन्सिंग पाळत ही दुकाने चालू ठेवली होती.दोन महिन्यानंतर दुकाने सुरू झाल्याने दुकानदारांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.ग्राहकांची तुरळक गर्दी होती.नगरपरिषदेची पथके या परिसरात पाहणी करत होती.नियम तोडणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.सलूनची दुकाने आजपासून सुरू होणार

लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका सलून व्यवसायिकांना बसला आहे.नगरपरिषदेने अखेर सलून दुकाने आठवड्यातून तीन दिवस जाहीर केलेल्या नियमावली व रोटेशन नुसार सकाळी 7.00 ते सायकांळी 7.00 पर्यत चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे.

सोशल डिस्टन्सिंग न पाळणारी तीन दुकाने सील

नगरपरिषदेने दिलेल्या आदेशाचा भंग केलेल्या  शहरातील प्रमुख बाजारपेठेतील श्याम कोळी यांचे झेरॉक्स दुकान,श्री.सद्गुरू बाळुमामा वस्त्र निकेतन व गणपती सारीज हे दुकाने जत नगरपरिषदेमार्फत सील करण्यात आली आहे.सदर कारवाई ही मुख्याधिकारी अभिजीत हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली व जत नगरपरिषद कडील कर्मचारी अमोल माने, विजय माळी,पांडू जेण्णे व वैभव चौगुले यांच्या पथकाने केली.हे आहेत नियम : 

 नगरपरिषदेकडून रोटेशन पद्धतीने (एक दिवस आड) दुकाने/आस्थापना सुरू करण्याबाबत विस्तृत आदेश देण्यात आले होते. जसे की:-

 1.दुकाने/आस्थापना यांनी सर्व उपस्थितांनी नाक व तोंड झाकेलं असे मास्क/ फेस कवर वापरणे बंधनकारक राहील.2.तसेच सोशल/ फिजिकल डीस्टनसिंग चे पालन करणे बंधनकारक राहील.यासाठी दुकानांनी/आस्थापनांनी दुकानाबाहेर सहा फूट अंतरावर उभे राहण्यासाठी गोल किंवा चौकोनी पट्टी आखावीत तसेच दुकानाच्या आकारानुसार व्यक्तींना दुकानात प्रवेश द्यावा.3.एकाच ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती जमणार नाही याची दक्षता घ्यावी.4.दुकानात येणाऱ्या व्यक्तीचे हात साबनाने धुण्याची किंवा स्यानीटायझर ने स्वच्छ करण्याची व्यवस्था करण्यात यावी.5.देवाणघेवाणीचे व्यवहार एकमेकांना स्पर्श न होता करणे बंधनकारक राहील.6.तसेच दुकाने अस्थापना येथील सर्व पृष्ठभाग दररोज सकाळी व सायंकाळी निर्जंतुक करणे बंधनकारक राहील.7.दुकाने/अस्थापना  यांनी परिसरात धुम्रपान करणे व थुंकण्यास मनाई राहील.असे अनेक विस्तृत निर्देश देण्यात आले होते.

नियमभंगाचा भंग केल्यानंतर नगरपरिषदेने ही दुकाने सील केली.
Attachments area