रावळगुंडेवाडीत मोठा चंदन साठा जप्त | विभागीय कार्यालयाच्या पथकाची कारवाई ; एका संशयितासह,पावनेचार लाखाचे,106 किलो चंदन ताब्यात


जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील रावळगुंडेवाडी येथे लॉकडाऊन काळातही साठा केलेल्या चंदन साठ्यावर मोठी कारवाई करण्यात आली. यात तीन लाख 71 हजार रूपयाचे 106 किलो चंदन जप्त करत संशयित यल्लाप्पा लक्ष्मण माने (वय 43,रा.रावळगुंडेवाडी)याला ताब्यात घेतले आहे.जत विभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकांने ही कारवाई केली.
जत तालुक्यात लॉकडाऊन काळातही सुरू असलेल्या चंदन तस्करीची माहिती खबऱ्याद्वारे पोलीस उपनिरिक्षक सुभाष कांबळे, विजय अकुल,सुनील व्हनखंडे,वाहीदअली मुल्ला यांच्या पथकाला मिळाली होती.त्या आधारे रावळगुंडेवाडी येथील संशयित यल्लाप्पा माने यांच्या राहत्या घरी छापा टाकला असता शेळ्या बांधणेच्या पञ्याच्या सेडनेटमध्ये बेकायदा,बिगर परवाना कोठूनतरी चोरून आणलेले चंदनाचे 106 किलो वजनाचे तुकडे प्लास्टिक पोत्यात विक्रीसाठी भरून ठेवल्याचे आढळून आली.