डफळापूरात बेकायदा दारू विक्री सुसाट | पाचपट दर वाढविले |दुकाने सील असतानाही दारू मिळण्यामागचे गौडबंगाल काय

डफळापूर,वार्ताहर : डफळापूर ता.जत येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असतानाही बेकायदा दारू विक्री सुसाट सुरू आहे.गावठी दारूसह काही बंद दुकान चालकांकडूनही पाचपट दर वाढवून दारू विकली जात असल्याचे समोर येत आहे.उत्पादन शुल्क विभागाच्या चुप्पीमुळे या अवैध दारू विक्रीला अभय मिळत आहे.जत पोलीस कोरोना सुरक्षेत अडकले आहेत.त्यामुळे त्यांच्या कारवाईला मर्यादा पडत आहेत.
कोरोनामुळे दारू दुकाने बंद करण्यात आले आहेत.तरीही डफळापूरात कोणत्याही बँन्डची दारू पाच पट रक्कम वाढवून मिळत असल्याची चर्चा आहे.
अगदी टेगोपंचचे दर 2200 रूपये बॉक्स वरून 8500 रूपये झाला आहे. तर पन्नास रूपयाची दारूची बाटली 300 रूपये झाली आहे.परिसरातील सर्व दुकान सील असतानाही ही दारू मिळतेच कशी असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
त्याशिवाय गावठी दारू विक्रेत्यांनी थैमान घातले आहे.अगदी स्टँड परिसरात गावठी दारू खुलेआम विकली जात आहे.

पश्चिम भागातील डफळापूर बेकायदा दारूचे केंद्र ?

शेळकेवाडीत पकडलेल्या दारूचे डफळापूर कनेक्शन असल्याची चर्चा आहे. शेगाव,जत येथे दारू दुकाने पुर्णत: बंद झाली आहेत,तरीही या भागात तेरा बॉक्स दारू सापडते या मागचे गौडबंगाल काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.


दुकानाचे परवाने रद्दचा प्रस्ताव पाठविणार.!


देश कोरोना विषाणुच्या प्रभावाने होरफळत असतानाही जत पश्चिम काही दारू विक्रेतांनी उच्चांद मांडला आहे.बाज,जिरग्याळ मधील कारवाईमुळे ते समोर आले आहे. कोठून दारू येते यांची माहिती काढण्याचे काम सुरू आहे.बंद असतानाही बेकायदा दारू विकणाऱ्या अशा परवाने धारक विक्रेत्याचे परवाने रद्द करण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना पाठविणार असल्याचे पोलीस निरिक्षक रामदास शेळके यांनी सांगितले.


उद्या वाचा नेमकी दारू येते कोठून,किती वाढविले दर