शेगांव ग्रामपंचायतीकडून मराठी शाळा कॉरंनटाईन सेंटरशेगाव,वार्ताहर ; शेगांव ग्रामपंचायतीकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवारपासून गावाबाहेरून म्हणजे मुंबई,पुणे,किंवा कोरोना सदृश भागातून आलेल्या व्यक्तीला गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये कॉरनंटाईन करण्यात येणार आहे.
त्यामुळे गावबाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती ग्रामपंचायतीला द्यावी
आज आपल्या गावातील एक नागरिक कोरोना सदृश भागातून आला होता. त्याला सकाळी 10 वाजता गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रा प कर्मचारी, पोलीस पाटील,आरोग्य सेविका,हायस्कूलचे मुख्याध्यापक ,शिपाई यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद शाळेत चौदा दिवसासाठी कॉरनंटाईन केले आहे.