गिरगांव कडकडीत लॉकडाऊनतिकोंडी,वार्ताहर : कोरोनोच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच दिवसासह  गिरगांव पुर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे.अत्यावश्यक सेवा वगळता गावातील रस्ते,चौक निर्मनुष्य झाले आहेत. 
तालुक्यातील सीमावर्ती भागातील गांव आहे.या गावातील नागरिकांची कर्नाटक राज्यातील अनेक गावांशी दररोज येणे जाणे आहे तसेच जवळच्या विजापूर येथे कोरोनो बाधित रुग्ण आढळून आले आहेत.त्याचबरोबर हा रुग्णाचा आकडा दररोज वाढत आहे.त्यामुळे नागरिक भीतीच्या छायेत आहेत.या सर्व परिस्थितीचा विचार करून गिरगांव हे गाव पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गावकऱ्यांचा स्वंयपुर्तेने सहभाग दिसून आला.आज लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे.

गिरगावमध्ये जनता कर्फ्यू मुळे चौक निर्मनुष्य बनले आहेत.