येळदरी ग्रामपंचायतीकडून सँनिटायझरचे वाटपबिंळूर,वार्ताहर : येळदरी ता.जत येथील ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना पार्श्वभूमीवर गावातील कुंटुबियांना सँनिटायझरचे वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून कुंटुबियांना सँनिटायझर  वाटण्यात करण्यात आले आहे.संरपच,उपसंरपच सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक उपस्थित होते.ग्रामपंचायतीचे कर्मचारी,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स यांच्याकडून हे सँनिटायझर घरोघरी जात वाटप करण्यात आले.कोरोनापासून बचावासाठी ग्रामपंचायतीकडून सर्व उपाय योजना करण्यात येत आहे.जंतू प्रतिबंधित औषध फवारणी,गावातील स्वच्छता,नागरिकांना प्रबोधन,दुकानातील सोशल डिस्टन्सिंग अशा उपक्रमातून जागृत्ती करत कोरोनाला हरविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन दक्ष झाले आहे.

येळदरी ग्रामपंचायतीच्या वतीने सँनिटायझर,वाटप करण्यात आले.