जत | इस्लामपूर मुख्याधिकारी हल्ला ; जतेत निषेध |जत,प्रतिनिधी : इस्लामपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार - पवार यांचे अंगावर धाऊन जाऊन जिवे मारण्याची धमकी देनेच्या कृत्त्याचा जत नगरपरिषद  मुख्याधिकारी,अधिकारी व कर्मचारी यांचे वतीने काळ्या फिती लावून जाहीर निषेध करण्यात आला.
इस्लामपूर येेते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेवा बजावत असताना स्थानिक काही लोकांनी मुख्याधिकारी पोतदार-पवार यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत शासकीय कामात अडथळा आणला.कोरोनाच्या लढाईत कोरोना वारियर्स म्हणून काम करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील असे हल्ले निंदनीय आहेत.या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत.असा भ्याड प्रकार करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी,अशी मागणी मुख्याधिकारी अभिजित हराळे व जत नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.त्यांचा निषेध म्हणून मंगळवार हाताला काळ्या फिती बांधून काम केले.


जत येथे इस्लामपूर मुख्याधिकारी हल्ला प्रकरणाचा निषेध करण्यात आला.